बोधामृत

साधकाने प्रथम शरीरशुद्धी व नंतर चित्तशुद्धी साधावी, चित्त म्हणजे ज्ञान. अज्ञानाचे आवरण झटकले पाहिजे. तदनंतर ज्ञानाचे आवरण चढले पाहिजे. अज्ञानाचे आवरण घालवण्यासाठी विकाराची काळजी व पुंटे नष्ट होणे आवश्यक आहे. त्याखेरीज ज्ञान होणार नाही. आत्मस्वरूप दिसणार नाही. त्याकरीता आत्म्याचे जागृतावस्थेत चिंतन करावे. श्री गुरु दत्तात्रेयांच्या सगुण मूर्तीचे अथवा केवळ तेजाचेच ध्यान हृदयात सतत करीत रहावे. अंतर्मुख होण्यासाठी हृदयस्थ श्री दत्ताचे ध्यान व श्री दत्ताचा मंत्र जपावा. या साधनेतून प्रगती निश्चितच होत जाईल. मनुष्य जन्माची सार्थकता करून घ्यावी. कलीयुगात नामस्मरण अत्यंत सोपा मार्ग आहे.

हे लक्षात ठेवून सदगुरू स्मरण आमरण व अखंड चालू ठेवावे.

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ