संक्षिप्त औदुंबर परिचय

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु : गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवेनमः ।।

महाराष्ट प्रांतातील सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले निसर्गरम्य सदगुरु स्थान म्हणजे श्रीदत्त क्षेत्र औदुंबर.  भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी चातुर्मास्य अनुष्ठान करून पवित्र पावन झालेले हे क्षेत्र .

याच ठिकाणी श्री दत्त गुरूंचे परम कृपेने एक मंद विप्रसुत ज्ञानविद्या संपन्न झाला.  असे हे ज्ञानदाते , भक्तोद्वारक तीर्थक्षेत्र !

ज्या स्थानावर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतीनी चातुर्मासात अनुष्ठान केले ते ठिकाण महानयोगी ब्रम्हानंद महाराज यांना गिरीनार पर्वतावर दत्तगुरूंनी दृष्टांत देऊन दाखाविले.  त्यानुसार ब्रह्मानंद महाराजांनी ते ठिकाण शोधून प्रसिद्धीस आणले . तेच सध्याचे श्रीक्षेत्र औदुंबर होय .

कृष्णा तीरावरील अंकलेश्वर व कोपेश्वर ह्या देवतांच्या नांवावरून अंकलखोप हे नाव रूढ झाले.  ह्या गावातील एक भाग म्हणजे सध्याचे पवित्र श्रीक्षेत्र औदुंबर होय.  जगदगुरू दत्तात्रेयांचे साक्षात  –  शिष्य परंपरेतील जनार्दनस्वामी यांना ह्याच पवित्र औदुंबर क्षेत्रात दत्तमहाराजांचा दर्शनानुग्रह झाला.  ह्याचे वर्णन खालील अभंगात जनार्दनस्वामी नी केले आहे.

अंकलखोप कृष्णातीरी । गुरु वसती औदुंबरी ।
धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर । जेथे गुरुवर वसतसे ।

अशा पवित्र स्थानी १८ वर्षे सदगुरु नारायणानंद तीर्थ स्वामींनी वास्तव्य करून आपल्या सर्व शिष्य भक्तांना सन्मार्ग दर्शन करून कृत-कृत्य केले .

सांगली शहरापासून सुमारे ३० कि. मी. अंतरावर कृष्णा नदीच्या तीरावर श्री क्षेत्र औदुंबर हे दत्तात्रयांचे जागृत स्थान आहे  .  गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ह्या इतर दत्त क्षेत्रा प्रमाणे श्री क्षेत्र औदुंबरला दत्तभक्तांच्या दृष्टीने स्थान महात्म्य लाभलेले आहे .

मुंबई  –  पुणे  –  कोल्हापूर लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पुढे भिलवडी स्थानकापासून ४ कि.मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर हे निसर्ग रम्य ठिकाण आहे.

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ