श्री महाराजांच्या अगाध लीला

महाराज एका सदगृहस्थाकड़े घरी गेले वेळी सर्व लोक बारा वाजेपर्यंत त्यांचे दर्शनास येत होते.  यतिना त्रिकाल स्नान असल्याने घरच्या मालकांनी स्नान करून आपले अनुष्ठान करण्यास उशीर होत आहे.  ह्या लोकांच्यामुळे आपणांस त्रास होत आहे. अनुष्ठान ध्यान करता येत नाही.  आपणांस त्रास होईल असे महाराजांना सांगितले. महाराज हसतमुखाने म्हणाले की,  ‘पायाला कान लावा’ असे म्हणून दुसरीकडे बोलत होते. त्यावेळीच त्यांना त्यांच्या पायावारिल प्रत्येक केसातून दत्तमंत्र ऐकू आला.

एकदा एक उच्च पदस्थ अधिकारी मंत्रिंचे बरोबर आश्रमात आले.  महाराजांना त्यांनी विचारले की आम्ही लवकरच लंडनला जाणार आहोत,  जाऊ शकेन काय ?असे विचारता महाराजांनी आपण जावू शकणार नाही असे सांगितले. त्यावेळी मला लेखी आर्डर आली आहे.  कसे जाणे होणार नाही असे त्या अधिकाऱ्यांनी विचारले असता स्वामी म्हणाले,  महाराष्ट्रावर लहान संकट येणार आहे.  तुमची खुर्ची तीच पण जंगलामध्ये राहून कारभार करावयास लागेल.  पुढे काही दिवसात कोयनेचा भूकंप झाला त्याचे लंडनला जाणे रद्द झाले.  पाटणच्या जंगलातच त्यांना वास्तव्य करावे लागले.  यावरून श्री स्वामींचे त्रिकालज्ञानित्व निदर्शनास येते.

तासगावचे डॉ.  परचुरे हे महाराजांकडे वरचेवर दर्शनास येत असत.  परंतु त्यांच्या घरातील लोकांची विशेष भक्ति गोंदवलेकर महाराजांच्यावर होती.  एकदा देवपूजा करीत असताना असा चमत्कार घडला की स्वामींच्या फोटोवर गोंदवलेकर महाराज व गोंदवलेकर महाराजांचे फोटोवर स्वामी महाराज असा महाराजांनी त्याना प्रत्यक्ष दृष्टांत दिला .

” ईश्वरो गुरुरात्मेति भेदत्रय विवर्जित:”

या वाक्यानुसार ईश्वर – गुरु – आत्मा – संत यामध्ये कधी भेद नाही असे दाखवले.

महाराज ईश्वर चिंतनात मग्न असताना एकदा अशी गोष्ट घडली.  महाराजांचा आहार फक्त दूध केळी असल्याने त्यांना तीन दिवस ते मिळाले नाही.  अनन्य चित्ताने परमात्म्याचे चिंतन करणा-या महाराजांचे शरीर पोषणाची व्यवस्था दत्तात्रेयांनी पोखर्णीच्या बापूंना दृष्टांत देवून,  रताळी आहार द्वारा केली.  यावरून ‘  योगक्षेम वहाम्यहम्’ या भगवत् गीतेच्या वाक्याचा अर्थ समन्वय येथे पाहता येतो.

भिलवडीचे प्रख्यात दुधाचे व्यापारी श्री भास्कर गणेश चितळे हे स्वामींचे एकनिष्ट भक्त होते.  ते नित्य औदुंबरी श्री दत्तदर्शनासाठी येत असत व महाराजांना आहार म्हणून आवश्यक असलेले दूध ते नित्य देत असत.  एके दिवशी नमस्कार करताना महाराज त्यांना म्हणाले तुम्ही निश्चित केलेल्या विवाह कार्यक्रमात अडचण येणार आहे. त्यामुळे दत्तगुरूंना लघुरुद्राभिषेक करा असे सांगितले.  पुढे महाराजांनी सांगितल्या प्रमाणे विवाहापूर्वी होणारी अडचण विवाहकार्य संपूर्ण झालेनंतर त्यादिवशी मृतवार्ता स्वरुपात समजली. विवाहात अडचण आली नाही.

श्री महाराज अनेक जन्म सुकृतामुळे बालपणापासूनच अध्यात्म मार्गातील श्रेष्ट अधिकारी होते.  त्यांना श्री दत्तगुरुंची नित्य जवळीक होती. श्री दत्तगुरूंचे बरोबर त्यांचे संभाषण होत असे.  या अधिकारीत्वामुळे अनेक जीवांच्या कर्माकर्माचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा उद्धार केलेला आहे व वैदिक धर्म व श्री दत्त भक्ती प्रसाराचे महान कार्य त्यांनी केलेले आहे.  अजूनही त्यांच्या सद्भाक्ताना त्यांची प्रचीती येत आहे. महाराजांच्या लीला अगाध आहेत.

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ